अघटित
Submitted by मिरिंडा on 3 June, 2016 - 12:54
पावसाळी रात्र. ..... रस्त्यावर दिवे नाहीत. तसा तो मोठा रस्ता होता. पालिकेला , वाहन चालवायला रस्त्यांवर दिव्यांची गरज काय असं वाटत असावं. आधीच अमावास्या , त्यात पाऊस आणि लगतच्या खाडीवरून येणारा वेगवान थंडगार वारा. तोंडावर पाण्याचे फटकारे बसत होते. वाहनांच्या दिव्यांनी जे दिसेल तेवढेच आणि तितकाच वेळ दिसत होते आणि समोरचं जग मुळी अंधारात गुडुप होतंय असं वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्याच्या हातात छत्री नव्हती की अंगावर रेनकोट नव्हता. विश्वास ....एक भक्कम बांध्याचा, चाळिशीकडे झुकलेला , पाच साडेपाच फूट उंचीचा प्रौढ तरूण होता.
शब्दखुणा: