#बकुळा

बकुळा .....

Submitted by अजातशत्रू on 1 June, 2016 - 23:44

चांगदेव पाटलाचे शेत गावाच्या शेवटच्या टोकाला असणारया पाझर तलावाला लागून होते. अर्धगोलाकार अशा भरावाच्या निमुळत्या अंगाला त्याचे शेत होते. बरड मातीचे ते रान होते पण सहा परस खोल असणारया तिथल्या विहिरीत पाणी मात्र भरपूर असायचे.वर खडकाळ जमिनीमुळे त्याचा उपसाही नव्हता तसा उपयोगही नव्हता. पाझर तलावाच्या पाण्याचे काही झरे त्या विहिरीत पाझरायचे. त्यांच्या शेताच्यापलीकडे गावची शिवेची हद्द होती.अशा या जमीनीत फार काही पिकत नव्हते. चांगदेव पाटलाचा थोरला पोरगा अंगद हा नावालाच शेतीकडे बघायचा. मशागतीची कामे चांगालाच करावी लागायची. थोरल्या अंगदला एक लहान भाऊ होता,काशीनाथ.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #बकुळा