तुम्हाला काय त्याचे
Submitted by बेफ़िकीर on 1 April, 2016 - 11:38
कुठे उत्साह पाझरले, तुम्हाला काय त्याचे
कुठे नैराश्य ओसरले, तुम्हाला काय त्याचे
पसरले काय दोघांनी कळेना काल रात्री
पहाटे काय आवरले, तुम्हाला काय त्याचे
शरीराला दिले स्वातंत्र्य ह्यावर हासताना
मनाला मीच सावरले, तुम्हाला काय त्याचे
फुले परकीय वेलीची इशार्यांनी बिलगली
कुणी निष्पर्ण मोहरले, तुम्हाला काय त्याचे
किती आकांत केले वेगळे होऊन आम्ही
कसे एकांत वापरले, तुम्हाला काय त्याचे
कुणाचे आटले अश्रू मनासाठी, नि हे मन
कुण्या अश्रूंमुळे तरले, तुम्हाला काय त्याचे
तशी तुमच्याकडेला एरवी थंडीच असते
कुणी कोणास पांघरले, तुम्हाला काय त्याचे
जिना नाकारताना जी लढाई खेळलो मी
विषय:
शब्दखुणा: