कुठे उत्साह पाझरले, तुम्हाला काय त्याचे
कुठे नैराश्य ओसरले, तुम्हाला काय त्याचे
पसरले काय दोघांनी कळेना काल रात्री
पहाटे काय आवरले, तुम्हाला काय त्याचे
शरीराला दिले स्वातंत्र्य ह्यावर हासताना
मनाला मीच सावरले, तुम्हाला काय त्याचे
फुले परकीय वेलीची इशार्यांनी बिलगली
कुणी निष्पर्ण मोहरले, तुम्हाला काय त्याचे
किती आकांत केले वेगळे होऊन आम्ही
कसे एकांत वापरले, तुम्हाला काय त्याचे
कुणाचे आटले अश्रू मनासाठी, नि हे मन
कुण्या अश्रूंमुळे तरले, तुम्हाला काय त्याचे
तशी तुमच्याकडेला एरवी थंडीच असते
कुणी कोणास पांघरले, तुम्हाला काय त्याचे
जिना नाकारताना जी लढाई खेळलो मी
किती सोपान थरथरले, तुम्हाला काय त्याचे
स्वतःचा जीव गेला तर बघू म्हणणार तुम्ही
शहरच्या शहर हादरले, तुम्हाला काय त्याचे
कवींची वाट झालो, वाहवा केली, विसरलो
स्वतःला रोज अंथरले, तुम्हाला काय त्याचे
मला माहीत नव्हते झुंज तुमच्याशीच आहे
तुम्हाला 'हातचे' धरले, तुम्हाला काय त्याचे
जिथे प्रत्येक गोष्टीची करत बसताय चिंता
कुणी 'बेफिकिर' वावरले, तुम्हाला काय त्याचे
-'बेफिकीर'!
पसरले काय दोघांनी कळेना काल
पसरले काय दोघांनी कळेना काल रात्री
पहाटे काय आवरले, तुम्हाला काय त्याचे>>व्वा
किती आकांत केले वेगळे होऊन आम्ही
कसे एकांत वापरले, तुम्हाला काय त्याचे>>व्वा
मला माहीत नव्हते झुंज तुमच्याशीच आहे
तुम्हाला 'हातचे' धरले, तुम्हाला काय त्याचे>>व्वा
स्वतःचा जीव गेला तर बघू म्हणणार तुम्ही
शहरच्या शहर हादरले, तुम्हाला काय त्याचे>>बढिया !
व्वा..खूपच छान.__/\__ एक न एक
व्वा..खूपच छान.__/\__
एक न एक शेर मस्त.!
खूप आवडली..
_/\_
_/\_
>>>स्वतःचा जीव गेला तर बघू
>>>स्वतःचा जीव गेला तर बघू म्हणणार तुम्ही
शहरच्या शहर हादरले, तुम्हाला काय त्याचे>>>सही!!
मोहरले,वापरले,तरले,पांघरले आणि मक्ताही सुंदर!आवडली गझल!
निव्वळ अप्रतिम !
निव्वळ अप्रतिम !
वा वा
वा
वा