विजेता

विजेता

Submitted by माधव on 5 January, 2016 - 08:44

फारा वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता. तेंव्हा खूप आवडला होता. मधे कधीतरी त्यातले 'मन आनंद आनंद छायो' हे गाणे ऐकले आणि मग हा चित्रपट बघावा असे वाटू लागले. त्या वाटण्याकडे सुरुवातीला मी दुर्लक्ष केले कारण तो चित्रपट ज्या काळात आवडला होता त्या काळात भरपूर मारामार्‍या आणि काहीतरी अद्भूत असलेले चित्रपटांचे मला अप्रूप होते. निर्लज्ज होऊन सांगायचे झाल्यास snake in monkey's shadow, 36 chambers of shaolin, जय संतोशी मा, नागज्योती (हो, असा एक द्क्षिणेकडे बनलेला हिंदी चित्रपट होता) असले अतरंगी चित्रपट तेंव्हा जाम आवडायचे. ही यादी अजूनही वाढवता येइल, पण लाज तरी किती सोडायची माणसाने!

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विजेता