कल्पांत

कल्पांत

Submitted by राजेंद्र देवी on 6 May, 2021 - 12:43

कल्पांत

किती चिता धडधलेल्या
अजून किती श्वास अडकलेले
दशदिशा फाटलेल्या अन
किती घरात काळोख दाटलेला

आटले माणुसकीचे झरे
मरती माणसे की जनावरे
थिजली नयने, थिजली मने
काय नियतीच्या मनात
कोण जाणे, कोण जाणे

किती उजाड झाली घरे
डोक्यावरती गिधाड फिरे
ना आता जगण्यासारखे उरे
कल्पांत आला आहे खरे

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

कल्पांत

Submitted by राजेंद्र देवी on 16 December, 2015 - 04:44

कल्पांत

काय करावे कोठे जावे
असतो डोळ्यापुढे अंधार
घेत असतो कोठल्यातरी
भिंतीचा तो आधार

चिंताग्रस्त चेहरा अन
खाण्याची असते भ्रांत
करीत असतो बेवारस
रस्ते तो पादाक्रांत

थकून भागून होउन क्लांत
झोकून देतो पदपथावर स्वतःला
त्याच्यासाठी असतो
हाच खरा कल्पांत

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कल्पांत