काही त्रिवेण्या

काही त्रिवेण्या

Submitted by बेफ़िकीर on 4 September, 2015 - 12:02

काही त्रिवेण्या:
=========

तो कचरा चिवडत होता
तर मीठ मिळाले त्याला
मग तोही कचरा झाला
===============

मी आल्याचे न कळवले
मी गेल्याचे न कळवले
मधले इतरांस विचारा
===============

तुझे फारसे क्षणसुद्धा गेले नसते
मला जुने अपुले युग सापडले असते
जर बघतीस मला माझ्या खिडकीमध्ये
=========================

मी नोकरी नाही करत
नाही उपाशीही मरत
मी धूर्त आहे केवढा
============

परवडत नाही मला असणे इथे
परवडत नाही मला नसणे इथे
परवडत नाही मला हे जाणणे
==================

दाद तू द्यावीस ह्यासाठी उगाचच
शेर तू अन् मी बदलले सर्व माझे
संपले तेव्हा तुझे अन् पर्व माझे

Subscribe to RSS - काही त्रिवेण्या