काही त्रिवेण्या

Submitted by बेफ़िकीर on 4 September, 2015 - 12:02

काही त्रिवेण्या:
=========

तो कचरा चिवडत होता
तर मीठ मिळाले त्याला
मग तोही कचरा झाला
===============

मी आल्याचे न कळवले
मी गेल्याचे न कळवले
मधले इतरांस विचारा
===============

तुझे फारसे क्षणसुद्धा गेले नसते
मला जुने अपुले युग सापडले असते
जर बघतीस मला माझ्या खिडकीमध्ये
=========================

मी नोकरी नाही करत
नाही उपाशीही मरत
मी धूर्त आहे केवढा
============

परवडत नाही मला असणे इथे
परवडत नाही मला नसणे इथे
परवडत नाही मला हे जाणणे
==================

दाद तू द्यावीस ह्यासाठी उगाचच
शेर तू अन् मी बदलले सर्व माझे
संपले तेव्हा तुझे अन् पर्व माझे
====================

काव्य नाही जिण्यात आताशा
ना तुझ्या मी मनात आताशा
ही त्रिवेणी उगाच केली मी
==================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद तू द्यावीस ह्यासाठी उगाचच
शेर तू अन् मी बदलले सर्व माझे
संपले तेव्हा तुझे अन् पर्व माझे
====================

काव्य नाही जिण्यात आताशा
ना तुझ्या मी मनात आताशा
ही त्रिवेणी उगाच केली मी
>>>
या दोन्ही आवडल्या

>>>काव्य नाही जिण्यात आताशा
ना तुझ्या मी मनात आताशा
ही त्रिवेणी उगाच केली मी<<<

वाह्...एक नंबर!!

आवडल्या या त्रिवेण्या, भारीयेत.

तो धागे चिवडत होता
तर जिलब्या मिळाल्या त्याला
मग तोही आचारी झाला.

(ह. घ्या.)

त्रिवेण्या छान आहेत,
पण मला

तो कचरा चिवडत होता
तर मीठ मिळाले त्याला
मग तोही कचरा झाला

हे समजले नाही...
काही इतर संदर्भ आहेत का?

उलगडेल का कुणी?