...डका.. बाराखडी

मडका - तफावत...

Submitted by लाजो on 11 July, 2015 - 09:32

मडका - तफावत....

आज पुन्हा एकदा
नि:शब्द गोठल्या सडका
बांधावर थिजले दवं
थंडीचा वाढला कड्डका...

गपगार बसलो ओढुन
जुना फाटका फडका...
ऊब तरी मिळेल कोठे
झोपडाच माझा पडका...

कोपर्‍यात बसली ती
कुशीत घेऊनी लडका
जोजवे अंगाई गाऊन
न बघवे चेहरा रडका ....

पलीकडे उंच कोठीत
पार्टीचा धुम धडाका
मद्याची भरली पात्रे
उसळे कारंजा व्होडका...

जेवणाच्या उठती पंगती
सुग्रास भोजने तडका
इथे मात्र पोटात

Subscribe to RSS - ...डका.. बाराखडी