आजचाही दिवस बरा गेला

आजचाही दिवस बरा गेला

Submitted by बेफ़िकीर on 29 June, 2015 - 14:07

जा म्हणालो, भराभरा गेला
आजचाही दिवस बरा गेला

ती अशी सोडते तिची वेणी
की तिचा एक मोहरा गेला

काच बदलून घे तुझी आता
आरश्या मूळ चेहरा गेला

वाचले चळवळीतले खोटे
आत केवळ कुणी खरा गेला

धावली सर्व माणसे जिकडे
एक वेडा तरातरा गेला

रुंद झाला असेल रस्ता पण
नेमका तोच कोपरा गेला

तो निराधार राहिला अंती
मात्र देऊन आसरा गेला

ही स्मशानात वाहवा झाली
की जणू एक सोयरा गेला

काय आलो समोर दशकांनी
चेहर्‍याला तुझ्या चरा गेला

ऊब नव्हती तुझी असे नाही
हा हिवाळाच बोचरा गेला

वाट चुकली असेल वेड्याची
ढग पुन्हा होत पांढरा गेला

ह्यापुढे काय हे कळत नाही

Subscribe to RSS - आजचाही दिवस बरा गेला