तुझं प्रेम

तुझं प्रेम

Submitted by गणेश पावले on 5 June, 2015 - 00:53

कित्येक मैलाचा प्रवास केल्यावर
मिळालेला विसावा म्हणजे तुझं प्रेम

अथांग सागर पोहून पार केल्यानंतर
मिळालेला किनारा म्हणजे तुझं प्रेम

आयुष्याच्या खडतर प्रवासात
लाभलेलं सुख म्हणजे तुझं प्रेम

अपार कष्ठानंतर सुखाची ओंझळभरून
मिळालेलं फळ म्हणजे तुझं प्रेम

सुखादुखाच्या असह्य वेदनेनंतर
क्षमलेली कळ म्हणजे तुझं प्रेम

मायेचा ओलावा.. ममतेचा पाझर
जीवनभराचा गारवा म्हणजे तू प्रेम

- गणेश पावले

Subscribe to RSS - तुझं प्रेम