बरसण्याची ठराविक वेळ असते

बरसण्याची ठराविक वेळ असते

Submitted by बेफ़िकीर on 29 April, 2015 - 13:01

बरसण्याची ठराविक वेळ असते
इथे आभाळ केव्हाही बरसते

कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते

कुणाचाही न जे करतात हेवा
अश्या लोकांमुळे हे जग धुमसते

अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते

हवी ती संस्कृती अभ्यासुनी बघ
निसर्गाचे तुला वरदान डसते

इथे होणार नव्हती विहिर बहुधा
तरी कोणीतरी पाणी उपसते

मनाला कायदे नसतात काही
कुणाचे 'बेफिकिर' कोणात वसते

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - बरसण्याची ठराविक वेळ असते