बरसण्याची ठराविक वेळ असते

Submitted by बेफ़िकीर on 29 April, 2015 - 13:01

बरसण्याची ठराविक वेळ असते
इथे आभाळ केव्हाही बरसते

कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते

कुणाचाही न जे करतात हेवा
अश्या लोकांमुळे हे जग धुमसते

अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते

हवी ती संस्कृती अभ्यासुनी बघ
निसर्गाचे तुला वरदान डसते

इथे होणार नव्हती विहिर बहुधा
तरी कोणीतरी पाणी उपसते

मनाला कायदे नसतात काही
कुणाचे 'बेफिकिर' कोणात वसते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम ..

>>>
कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते

कुणाचाही न जे करतात हेवा
अश्या लोकांमुळे हे जग धुमसते
<<<

हे दोन , क्लासिक !

कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते

अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते

क्या ब्बात!

कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते

कुणाचाही न जे करतात हेवा
अश्या लोकांमुळे हे जग धुमसते

व्वावा

कदाचित हे तुला पटणार नाही
उगवतो सूर्य तिकडे पूर्व असते

अशी जागा मला का सापडेना
जिथे कोणीतरी नुसतेच बसते

वाव्वा !

छान! आता शीर्षकाच्या पहिल्या शब्दातील र हे अक्षर काढून बनणार्‍या नव्या शीर्षकांतर्गत एक खुसखुशीत विडंबन होऊन जाऊ द्या.

>>> ब(र) सण्याची ठराविक वेळ असते
सहमत आहे. मुडबिड असावा लागतो.

बाकी, रचना कुंथुन आल्यासारखी वाटली.
मजा नै आली, काही तरी चांगलं लिहा.

-दिलीप बिरुटे