ललित प्रभाकर

तो, ती, आणि फुजी

Submitted by अमितव on 13 April, 2026 - 16:18

ती (मृण्मयी गोडबोले) परक्या शहरात, परक्या देशात आहे, आणि तिला अचानक रस्त्यात तो (ललित प्रभाकर) दिसतो. तिच्या नजरेत त्याच्या बद्दल काही आहे. ती काही काळ त्याचा पाठलाग करते, त्याला भेटून ओळख द्यावी न द्यावी हा संभ्रम तिच्या डोळ्यात दिसतो आणि तो रस्ता ओलांडायला उभा असताना त्याच्या बाजुला ती उभी रहाते. त्याला ती दिसते, त्याच्या आणि तिच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडुन वहात असताना ते एकमेकांना आलिंगन देतात. ती संध्याकाळ दोघे एकत्र घालवतात. त्यातून त्यांच्यात काहीतरी जुने बंध, ओळखच न्हवे तर घट्ट मैत्री, बहुतेक त्याहुन जास्त अजुन काही आहे याची आपल्याला खात्री पटते.

झोंबिवली - मराठी चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 May, 2022 - 14:55

झोंबी म्हणजे जिवंत प्रेत! एक शरीर ज्यात आत्मा तर आहे. पण मेंदू नेहमीसारखा काम करायचा बंद झाला आहे. जणू एक पुरलेली सडलेली डेडबॉडी उकरून काढली आणि तिला खेळण्यासारखे चावी देऊन सोडले लोकांचा चावा घ्यायला. पण गंमत ईथेच संपत नाही. हे झोंबी ज्यांचा चावा घेतात ते सुद्धा झोंबी होतात. आणि हे जास्त डेंजर असते. कारण अश्याने यांची संख्या वाढतच जाते. वाढतच जाते. वाढतच जाते. पण यावर ऊपाय काय? पहिला झोंबी नेमका कश्यामुळे बनतो? आणि हे झोंबी नेमके दिसतात कसे? करतात काय? या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील, तर झोंबिवली जरूर बघा.

विषय: 
Subscribe to RSS - ललित प्रभाकर