ऊणे बारा

डोक्यावरचे आकडे

Submitted by दिनेश. on 17 April, 2015 - 08:10

गेल्या आठ दहा दिवसांपासून मला एक विचित्र अनुभव येतोय. इतका विचित्र कि इथे लिहायलाही अवघड वाटतेय.
खास करुन त्या अनुभवांचा अर्थ काय ते समजल्यापासून.

म्हणजे काय होतं, मी आजकाल रस्त्यावरून फिरत असतो त्यावेळी दिसणार्‍या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मला
एक आकडा दिसतो. धूसर वगैरे नाही, अगदी स्पष्ट. आणि होतं काय हे आकडेच मला जास्त आकर्षित करतात. आधी त्या डोक्यांवरच्या आकड्यांकडे लक्ष जाते आणि मग त्या व्यक्तीकडे.

आकड्यांसारखे आकडे. विशेष असे काही नाही. कुणाच्या डोक्यावर ७,४७८ दिसतात तर कुणाच्या डोक्यावर १४,५९६. बघाना, काही अर्थच लागत नाही या आकड्यांचा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ऊणे बारा