फेरीवाले

आरोळ्या फेरीवाल्यांच्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 July, 2016 - 05:46

पूर्वी मुंबई सोडली तर इतर शहर, गावांत आतासारखी बाजारपेठ खूप कमी होती. मॉल तर अस्तित्वातच नव्हते. मग काही नित्य गरजा भागवणार्‍या वस्तूंसाठी दारावर येणार्‍या फेरीवाल्यांची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक फेरीवाले तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या रस्त्यावरून दारापर्यंत येणार्या आरोळीवरून कोण व्यक्ती आली असेल हे कळायची. कुठल्या कुठल्या दूरवरच्या गावातून ही लोक व्यवसायासाठी पायी भटकत यायची.

विषय: 
शब्दखुणा: 

मुंबई लोकल ट्रेन मधले फेरीवाले

Submitted by मधुरा मकरंद on 7 April, 2015 - 02:20

गेली २२-२३ वर्ष बोरीवली चर्चगेट असा लोकल ट्रेनचा प्रवास करत आहे. बहुतेक वेळा सकाळ संध्याकाळ ठरलेल्या लोकल ट्रेनचा आणि ठरलेल्या डब्यातूनच प्रवास. त्यामुळे बऱ्याच ओळखी झाल्या. सहप्रवासी मैत्रिणी मिळाल्या. ठरलेल्या वेळेत फलाटावर असताना नेहमीचे पुरुष प्रवासीही तोंडदेखले ओळखीचे झाले. कधी कुणीतरी दुसरीकडे ... बँकेत... ऑफिसात भेटले देखील! स्टेशनं देखील ओळखीची व्हायला लागली. काही स्टेशनांचे वास सवयीचे झाले. प्रवासाचा वेळ घड्याळ न बघता कळू लागला.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - फेरीवाले