घायाळ मी हरिणी

'सिडनी' मधला थरार आणि सख्या रे घायाळ मी हरिणी

Submitted by अतुल. on 16 March, 2015 - 17:28

काही काही योगायोग विलक्षण असतात. एखादे गाणे ऐकावे आणि काही काळातच त्या गाण्यातल्या अर्थाची घटना खऱ्या आयुष्यात घडलेली ऐकायला मिळाली कि मन स्तिमित होते. परवा सहज लताजींनी गायलेले 'सामना' मधले "सख्या रे घायाळ मी हरिणी" ऐकत होतो. हे गाणे विलक्षण आहे. किंबहुना सामना चित्रपटच विलक्षण आहे. माझ्या जन्माच्या आधीचा चित्रपट. पण माझे भाग्य असे कि कसल्याश्या फेस्टिवल वगैरेच्या निमित्ताने पुण्यात अलका थियेटरच्या मोठ्या पडद्यावर मला हा चित्रपट एकदा पाहायला मिळाला होता. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा चित्रपट थिएटरला पाहणे हा एक अप्रतिम अनुभव आहे. खरेच. एकच शब्द "अप्रतिम".

Subscribe to RSS - घायाळ मी हरिणी