मुंबई गणेशोत्सव २०१४

"आतुरता तुझ्या दर्शनाची" (१) — लालबाग, परळ, दादर, माटुंगा परीसर

Submitted by जिप्सी on 31 August, 2014 - 23:51

मुंबईतील लालबाग, परळ, दादर, माटुंगा विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची हि प्रचि. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रतिकृती, नेत्रदिपक रोषनाई, भव्य गणेशमूर्तीने मुंबईचा गणेशोत्सव रंगला आहे. गणेशगल्लीत यंदा जेजुरीची भव्य प्रतिकृती बनवली आहे, तर रंगारी बदक चाळ यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. तेजुकायाचा गणेश शेषनागावर विराजला आहे तर नरे पार्कातला बाप्पा श्री विष्णु अवतारात आहे. लाल मैदानात अजिंठाची प्रतिकृती केली आहे तर जी.एस.बी.एस मंडळाचा मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा हिरक महोत्सव साजरा करत आहे.

Subscribe to RSS - मुंबई गणेशोत्सव २०१४