"आतुरता तुझ्या दर्शनाची" (१) — लालबाग, परळ, दादर, माटुंगा परीसर

Submitted by जिप्सी on 31 August, 2014 - 23:51

मुंबईतील लालबाग, परळ, दादर, माटुंगा विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांची हि प्रचि. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध प्रतिकृती, नेत्रदिपक रोषनाई, भव्य गणेशमूर्तीने मुंबईचा गणेशोत्सव रंगला आहे. गणेशगल्लीत यंदा जेजुरीची भव्य प्रतिकृती बनवली आहे, तर रंगारी बदक चाळ यावर्षी सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. तेजुकायाचा गणेश शेषनागावर विराजला आहे तर नरे पार्कातला बाप्पा श्री विष्णु अवतारात आहे. लाल मैदानात अजिंठाची प्रतिकृती केली आहे तर जी.एस.बी.एस मंडळाचा मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा हिरक महोत्सव साजरा करत आहे. परळचा कृष्णनगर मंडळाचे हे ९५ वर्षे असुन नायगाव-दादरच्या स्प्रिंग मिलमध्ये यावर्षी गुजरातच्या अंबाजी मातेच्या मंदिराची प्रतिकृती सादर केली आहे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६
|| तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता ||
प्रचि ३७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि ३७ फार सुंदर. बाकीचेही मस्तच. माटुंग्याचा फुलमार्केटचा आणि जीएसबी गणपती दरवर्षी बघते. फुलमार्केटची मुर्ती अवाढव्य नसली तरी आरास अफलातून असते. ह्यावर्षी अजून जायचे आहे.

मस्त फोटो. घरबसल्या गणपतीदर्शन झाले.

जिएस्बीच्या गणपतीचे पंजे आणि बाकीचे दागिने सोन्याचे आहेत काय?

प्रत्यक्ष जाउन दर्शन घेणे शक्य नाही पण जिप्सी, तुमच्या फोटोंमुळे प्रत्यक्ष दर्शनाचचं समाधान मिळालं

जिएस्बीच्या गणपतीचे पंजे आणि बाकीचे दागिने सोन्याचे आहेत काय? <<<< साधना, हो.
जिप्सी, धन्यवाद. सगळ्या बाप्पांचे दर्शन दिल्याबद्दल.

मस्तच रे...एकसे एक बाप्पा...
सध्या मल्हारी मार्तंडांची जोरदार चलती आहे...पुण्यात पण काही ठिकाणी या रुपातले दिसतायत....

बाकी जीएसबीचा गणपती वाकलाय सोन्याच्या भाराने असे वाटत आहे. याच गणपतीचा २४ कोटींचा विमा उतरलाय ना...
वडाळाचा का माटुंगाचा???

शेवटचा प्रचि खास जिप्सी टच....

मस्त फोटो आणि धन्यवाद आमचे लाईन लावण्याचे कष्ट नाहीसे केल्याबद्दल.

लालबागच्या राजासाठी वेगळा धागा काढणार का?

वा, वा!!! घरच्या घरी सर्व सुप्रसिद्ध गणपतींचे दर्शन. जिप्सी तुला अनेकानेक धन्यवाद.

शेवटचा प्रचि खास जिप्सी टच.... >>> आशु + १

व्वा ... पावसापाण्यातुन जाउन लायनीत उभे रहुन गणपती पाहणे काही झाले नसतेच.
धन्यवाद जिप्सी, तुमच्यामुळे आरामात मुम्बैचे गणपती बाप्पा बघुन झाले.
ते ही धक्काबुक्की, हाणामारी, ढकलाढकली, गडबड गोन्धळ, गोंगाट कल्ला कशाचाही त्रास न होता....!!
सो .. परत धन्यवाद.

मस्त फोटो. घरबसल्या गणपतीदर्शन झाले. >>++११

नेहमिप्रमाणे अप्रतिम योगेश..

सुंदर... आणि पाऊसपाण्यातून जाऊन फोटो काढलेस आणि इथे सर्वांना दाखवलेस, त्याबद्दल तूझे कौतूक करावे तेवढे थोडेच.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! Happy

जिएस्बीच्या गणपतीचे पंजे आणि बाकीचे दागिने सोन्याचे आहेत काय?>>>>हो सगळे दागिने सोन्याचे आहे. तब्बल ७० किलो सोन्याचे दागिने. Happy

याच गणपतीचा २४ कोटींचा विमा उतरलाय ना... वडाळाचा का माटुंगाचा???>>>>आशु, वडाळ्याच्या गणपतीचा २४ कोटींचा (बहुतेक त्यापेक्षा जास्त) विमा उतरवला आहे. यंदाचे त्यांचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. Happy

लालबागच्या राजासाठी वेगळा धागा काढणार का?>>>>लालबागच्या राजाच्या दर्शनाला जर जास्त गर्दी नसेल ( हे होणे शक्यच नाही Happy ) तरच जाणार आहे. Happy

खूप सुंदर. तुमचे मनापासून धन्यवाद! सातासमुद्रापलिकडून मुंबईच्या गणपतींचं इतकं छान दर्शन घडवलंत!

फुल मार्केट, माटुंगा - गणपतीचे आजचे डेकोरेशन. बाजूला एक माणूस उद्याच्या डेकोरेशनची तयारी करत होता. ह्या वेळचं डेकोरेशन दरवर्षीसारखं कलात्मक नाही वाटलं. नल्लीच्या जाहिरातीं रसभंग करतायत.

matunga ful market.JPG

चालले पण उद्या सगळे परत Sad