लीडर
Submitted by हायझेनबर्ग on 9 June, 2014 - 00:10
* २००७ मध्ये सदस्य झाल्यावर माझी ही मायबोलीवरची बहूधा पहिलीच कथा असावी. २००९ मध्ये काही कथा मी काढल्या होत्या आणि त्यांची दुसरी कॉपीही नव्हती. आज अचानक जुन्या पेन ड्राईववर ही सापडली. माझ्या मते बहूतेक हा कथेचा पहिलाच ड्राफ्ट असावा. नव्याने सदस्य झालेल्या मायबोलीकरांसाठी पुन्हा प्रकाशित करत आहे.
शर्याचा हा सलग दुसरा दिवस होता कँटीनमध्ये न येण्याचा. तो असा कधीच मला न सांगता गायब होत नसे. सम्या, श्री, सोनल, चारु अन् मन्या सगळेच लेक्चर संपवून कँटीनमध्ये नेहमीसारखाच दंगा घालत होते. का कुणास ठाऊक मला दुपारपासून लेक्चरला जावसं वाटतच नव्हतं , बहुतेक शर्यामुळेच असावं.
विषय:
शब्दखुणा: