काय म्हणाल ?
Submitted by नितीनचंद्र on 2 May, 2014 - 02:20
भारत देश आणि भारताचा निवडणुकीच्या संदर्भातला कायदा हा एक संशोधनाचा विषय व्हावा.
मोदींनी निवडणुक आचारसंहीतेचा भंग केल्यासंदर्भात दोन एफ आय आर झाले आहेत. पैकी एक भाषण केल्या संदर्भातला आहे आणि दुसरा निवडणुक चिन्ह प्रदर्शित केल्या संदर्भातला आहे.
मतदान केंद्रात निवडणुक चिन्ह घेऊन जायचा मज्जाव असतो हा कायदा अत्यंत जुना आहे अस असताना काँग्रेस पक्षाला निवडणुक आयोगाने हाताचा पंजा हे चिन्ह दिलेच कसे ? अर्थात त्या वेळेला शेषन मुख्य आयुक्त नव्हते हे विसरुन चालणार नाही.
शब्दखुणा: