राम जन्मला गं सखे राम जन्मला
Submitted by pltambe@yahoo.co.in on 8 April, 2014 - 08:43
राम जन्मला गं सखे राम जन्मला
मर्यादा पुरषोत्तम प्रभुरामचंद्राचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला असल्याने या तिथीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामांना जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती. असे महात्म्य आहे या दिवसाचे.
विषय:
शब्दखुणा: