अमानुष

अमानुष

Submitted by ashishcrane on 4 April, 2014 - 22:40

अमानुष

फुलाशी गप्पांत त्याच्या..शब्दांच्या शृंकला,
माणूस पाहुनी मात्र...तो न जाने का भुंकला!

मंदिरात मूर्तीशी हात जोडीले भक्तीने,
उतरताना पायऱ्या...भिकाऱ्यापाशी तो थुंकला.

उठले रोमांच अंगी, तो उंची अत्तरात गुंतला,
वाऱ्यात येता वास माणसाचा, तो तिरस्कारी शिंकला

नरकाचे शाप दिले...त्यासी जगाने,
झोपुनी पैश्यावर तो म्हणे, मी स्वर्ग जिंकला.

--आशिष राणे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अमानुष