सत्याच्या पलिकडले

नयनामृत

Submitted by सत्यजित on 25 January, 2014 - 20:44

आता फारसं जाणं होत नाही
की जाववत नाही कुणास ठाऊक?
पण गेलो की जाऊन बसतो
विहीरीवर तासंतास
ही विहीर बघितली की
आठवतात तुझे कथिल पाणेरी डोळे..

कधी दुथडी भरुन वाहणारे
तर कधी गहन खोल
आता विहीरीच्या काठावरती
तुझ्या डोळ्यांची आर्त ओल

दिसते मा़झी छबी खोल
पण आता थोडीशी अंधूक
विहीर होते डोळ्या देखत
ओल्या आठवणींची संदूक

इतक्यात कुणी माहेरवाशीण
विहीरीचे ओढते पाणी
मी ओंझळ पसरुन मागुन घेतो
तिच्या कळशीतले थोडे पाणी
.....
...

-सत्यजित.

Subscribe to RSS - सत्याच्या पलिकडले