दळतो आहे

घुसमट

Submitted by संतोष वाटपाडे on 18 January, 2014 - 08:27

अजून माझ्या आयुष्याला दळतो आहे ,
तरी पसारा भुतकाळाचा छळतो आहे .....

हाव सुटेना दुष्ट सुखाची काही केल्या,
संपत नाही भूमी तोवर पळतो आहे....

रोज जरीही तळमळणारा पाउस पडतो,
विदर्भ सारा रोजंच का हो जळतो आहे.....

सत्ता ज्याची तोच बनवतो भाग्य आपले,
हळूच बोका घरात उंदिर गिळतो आहे.....

निर्धन बेघर कधीच झालो होतो मीपण,
अता कुठे या वादळातही रुळतो आहे....

मिळण्यासाठी अता गरीबी रांग लागते,
स्वाभिमान तर फ़ुकटामध्ये मिळतो आहे....

स्वातंत्र्याला मिळून झाली अनेक वर्षे ,
तरी तिरंगा देशाचा तळमळतो आहे ......

शब्द बांधण्या गजलेमध्ये अवखळ माझे ,
दोर सुताचा मजबूतीने वळतो आहे ....

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दळतो आहे