घुसमट

Submitted by संतोष वाटपाडे on 18 January, 2014 - 08:27

अजून माझ्या आयुष्याला दळतो आहे ,
तरी पसारा भुतकाळाचा छळतो आहे .....

हाव सुटेना दुष्ट सुखाची काही केल्या,
संपत नाही भूमी तोवर पळतो आहे....

रोज जरीही तळमळणारा पाउस पडतो,
विदर्भ सारा रोजंच का हो जळतो आहे.....

सत्ता ज्याची तोच बनवतो भाग्य आपले,
हळूच बोका घरात उंदिर गिळतो आहे.....

निर्धन बेघर कधीच झालो होतो मीपण,
अता कुठे या वादळातही रुळतो आहे....

मिळण्यासाठी अता गरीबी रांग लागते,
स्वाभिमान तर फ़ुकटामध्ये मिळतो आहे....

स्वातंत्र्याला मिळून झाली अनेक वर्षे ,
तरी तिरंगा देशाचा तळमळतो आहे ......

शब्द बांधण्या गजलेमध्ये अवखळ माझे ,
दोर सुताचा मजबूतीने वळतो आहे ....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिळण्यासाठी अता गरीबी रांग लागते,
स्वाभिमान तर फ़ुकटामध्ये मिळतो आहे....<<< छान!

र्‍हस्व दीर्घ तपासावीत.

(एक वाक्य येथे लिहायचे राहिले होते हे नंतर आठवले. र्‍हस्व व दीर्घ मात्रांच्या हिशोबानुसार तपासावे असे म्हणायचे होते)

रोज जरीही तळमळणारा पास पडतो,

हळूच बोका घरात उंदिर गिळतो आहे.....

आता कुठे या वादळातही रुळतो आहे....<<< येथे आता चे अता किंवा आज करावे लागेल.

(खयाल नेहमीचे असल्यास मांडणी शैलीदार केली की अधिक प्रभावी गझल होऊ शकते. तसेच सफाईही असावी). कृ गै न.

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

संतोषजी खूप सुंदर गझल सर्व शेर खूप आवडले.

सत्ता ज्याची तोच बनवतो भाग्य आपले,
हळूच बोका घरात उंदिर गिळतो आहे.....

मिळण्यासाठी अता गरीबी रांग लागते,
स्वाभिमान तर फ़ुकटामध्ये मिळतो आहे....

स्वातंत्र्याला मिळून झाली अनेक वर्षे ,
तरी तिरंगा देशाचा तळमळतो आहे ...... हे तीन शेर अतिशय आवडले

शेवटच्या शेरात "दोर सुताचा मजबूतीने वळतो आहे ...." ऐवजी दोर "लयीचा" मजबूतीने वळतो आहे ...." असे आले तर बरे होईल असे मला वाटते बाकी तद्न्य आहेतच .

भुतकाळाचा ऐवजी गतकाळाचा केल्यास ती सूट घ्यावी लागणार नाही. अर्थात, जर भुतकाळाचाच म्हणायचं असेल तर मग हा मुद्दा गैर आहे...