कथा...

.... भेट ....

Submitted by मिलिंद महांगडे on 28 December, 2013 - 01:47

" हो ... हो... मी निघतो ताबडतोब " दादासाहेबांनी फोन खाली ठेवला, पलीकडुन जी बातमी आली ती डोकं सुन्न करणारी होती हे त्यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावरुन कळत होतं. थोडा वेळ ते तसेच बसुन राहीले. नंतर भानावर आल्यावर तत्काळ ड्रायवरला गाडी काढायला सांगितली. दुसरा फोन लावला, " Mery , cancel todays all meetings and appointments... i am leaving.... " बोर्ड मिटींग बाबत आणखी काही सुचना देऊन त्यांनी फोन ठेवला. आपल्या केबिनमधुन जवळ जवळ धावतच ते बाहेर पडले. दादासाहेब अचानक बाहेर आलेले पाहुन इतर सगळ्या स्टाफची चांगलीच भंबेरी उडाली. हातातली कामे जशीच्या तशी टाकुन धडपडत सगळे उभे राहीले.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कथा...