"ती" एक शतशब्दकथा.
Submitted by शाबुत on 8 September, 2013 - 00:49
... कालच तिच्यावर बलात्कार झाला.
.... अन् आज सकाळीच तिला अचानक प्रसिध्दी मिळाली.
..... नाहीतर तर ती राहते त्याच्या बाजुच्या गल्लीत तिचे नावही कोणालाही माहीती नव्हते.
.... दुपार पासुन तिला न्याय मिळावा यासाठी शहरा-शहरात मोर्चे निघाले.... सभा झाल्या... तज्ञांच्या चर्चा झडल्या.
.... तिचं जे हिरावुन घेतलं ते काही केल्या परत मिळणार नाही.
... हे माहीती असुनही तिच्या प्रकरणात प्रत्येकाने रस घेतला.
.... अन् वाहत्या गंगेत आपला हात धुवुन घेतला.
.... खरचं या प्रकरणात काहीतरी वेगळं आहे.
... कारण इथे खायाचे दात आणि दाखवायाचे दात वेगळे आहेत.
शब्दखुणा: