पुण्यात श्रावणातही गरम असते - तरही
Submitted by बेफ़िकीर on 27 August, 2013 - 11:17
नशीब हे नको तसे मलम असते
तिथेच लागते जिथे जखम असते
तरी प्रयत्नवाद अंतरी जपतो
जरी तुझीच प्रार्थना प्रथम असते
अनेक धन्यवाद विसरण्यासाठी
मनात आजही अनंत भ्रम असते
नशा गझल रचून केवढी मिळते
बिले भरायला उगाच रम असते
असेल ती तिथे मुशायरा ठरवा
पुण्यात श्रावणातही गरम असते
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: