पुण्यात श्रावणातही गरम असते - तरही

Submitted by बेफ़िकीर on 27 August, 2013 - 11:17

नशीब हे नको तसे मलम असते
तिथेच लागते जिथे जखम असते

तरी प्रयत्नवाद अंतरी जपतो
जरी तुझीच प्रार्थना प्रथम असते

अनेक धन्यवाद विसरण्यासाठी
मनात आजही अनंत भ्रम असते

नशा गझल रचून केवढी मिळते
बिले भरायला उगाच रम असते

असेल ती तिथे मुशायरा ठरवा
पुण्यात श्रावणातही गरम असते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटचा जाम भारी
बाकीचे नेहमीसारखे ......"प्रथम तुज पाहता जीव वेडावला".... ह्या सदरातील वाटले नाहीत आज --वै म गै न
Happy

माणसाने अठरा मिनिटांत तरही मिसर्‍यावर गझल रचली, तीही पाच शेरांची, तंत्रशुद्ध! काही म्हणून कौतुक नाही या आजच्या कम्युनिटीला!

लेकांनो, असा उत्स्फुर्त कवी मिळणार नाही तुम्हाला पुन्हा! Proud

या गझलेतील दुसरा शेर उत्तम, तिसरा डचमळवणारा आणि पाचवा मिश्कील आहे. आता पाच शेरांत आणखीन काय द्यायचे इतक्या कमी अवधीत? Proud

हे रिमार्क्स मी ही गझल कोणाचीही असती तरी असेच दिले असते हे सर्व गझलकारांना नक्कीच मान्य असेल Proud

असो!

धन्यवाद वैवकु! Happy

या गझलेतील दुसरा शेर उत्तम, तिसरा डचमळवणारा आणि पाचवा मिश्कील आहे. आता पाच शेरांत आणखीन काय द्यायचे इतक्या कमी अवधीत?
अगदी अगदी.

मतला मात्र डगमगवणारा वाटला जरासा.' नको तसे ' का ते कळले नाही ..

जिथे जखम असते तिथेच नशीब पुन्हा जखम करते. माणूस नशीबाकडे एक 'मलम' म्हणून पाहात असतो, पण नशीब मलम म्हणून कार्य न करता घावच करते / घालते.

धन्यवाद!

(या गझलेला माझेच प्रतिसाद अधिक आहेत) Proud

नशीब हे नको तसे मलम असते
तिथेच लागते जिथे जखम असते

तिथेच लागते जिथे जखम असते...वा !

तिथेच लागते जिथे जखम असते...वाह वा !!

तिथेच लागते जिथे जखम असते......वा वा वा !!!

तरी प्रयत्नवाद अंतरी जपतो
जरी तुझीच प्रार्थना प्रथम असते

या शेरांचा अंमल जाता जात नाहीय !

१८ मिनीटात आख्खे ५ शेर...वा ! शेर दिल शायरी !!!

-धन्यवाद!

म्हणजे तुमच्या मनाला जर यदाकदाचित काही जखमा झाल्याच असतील तर त्यांवर तुमचे नशीब मलम म्हणून काम करत असेल! या अर्थाने नशीबवान आहात! Happy

नशीब हे नको तसे मलम असते
तिथेच लागते जिथे जखम असते

-ह्या शेराची खरी मजा लागते ह्या शब्दात आहे पहिल्या ओळीत नशीबाला मलम म्हणून झाले आहे
-आता मुद्दा असा की ते नको तसे मलम असते म्हणजे ते तसे असायला नको आहे असा आशय व्यक्त होतो
-आता ते कसे मलम आहे तर "लागणारे" =दुखावणारे पुन्हा जखम करणारे तेही जिथे जखम आहे तिथेच पुन्हा जखम करणारे ...काय आहे ? तर मलम आहे ,,,पहा किती विचित्र मलम आहे !!!!!

एकूणात अर्थ : नशीब हे एक नसायला हवे अश्याप्रकारचे मलम असते ते एक तर लागते व तेही तिथेच जिथे आधीच जखम असते

हुश्य दमलो बुवा अर्थ काढून !! Proud
धन्यवाद

जगातील खूप लोकांना रात्रीच्या पहिल्या प्रहरी, श्रावणातच काय पण कुठल्याही महिन्यात गरम वाटते/होते. ह्यालाच 'ग्लोबल वॉर्मिंग' म्हणतात काय? Proud

गजल आवडली.

नशीब हे नको तसे मलम असते
तिथेच लागते जिथे जखम असते

तरी प्रयत्नवाद अंतरी जपतो
जरी तुझीच प्रार्थना प्रथम असते

मस्त!

तरी प्रयत्नवाद अंतरी जपतो
जरी तुझीच प्रार्थना प्रथम असते

अनेक धन्यवाद विसरण्यासाठी
मनात आजही अनंत भ्रम असते

सुंदर शेर झालेत.

शुभेच्छा .