जय वीरुच्या गप्पा बाबूराव

जय वीरु

Submitted by बाबूराव on 22 July, 2013 - 04:59

जय वीरू
=======

"जय तू लईच इसरभोळा गड्या "
"का रं इ-या ?"
"आरं तू मेला व्हतास कि मागं ? अन आत्ता जित्ताच फिरतुयास गावभर"
"मर्दा, गोळी लागली म्हनुन लगिच जाळाय निघत्यात व्हय ? लास्ट मोमेन्टला लाकडं बाजुला झालि म्हनुन वाचलु. नायतर जाळला व्हता मला"
"पन तुच म्हनला व्हता ना, येकदा गानं म्हन, अन मान टाकली का, आमाला वाटलं उडलाच "
"आहा रं मर्दा ! गोळी लागल्यावर सुध नाय जात व्हय ? आता तुलाच बसंतीला घेवुन जायची हित्की घाइ झाल्ती कि मी जा म्हनलं का पळाला"
"न्हाय जय न्ह्याय ! आसं काळजाला घरं पाडनारं बोलु नगंस. तुच म्हनला व्हतास, जा नाय तर शपथ हाय"

विषय: 
Subscribe to RSS - जय वीरुच्या गप्पा बाबूराव