एक वेडा निशिगंध

एक वेडा निशिगंध

Submitted by पुरंदरे शशांक on 9 June, 2013 - 19:37

एक वेडा निशिगंध

तुझ्या मनी फुललेला
एक वेडा निशिगंध
सार्‍या ऋतूत आगळा
सुवासतो धुंद फुंद

थेंब घेई पाकळ्यात
एक एक साठवून
कण कण ओलाव्याचे
येती मग उमाळून

शिशिराची थंडी त्यास
कधी बाधू ना शकते
नित्यनवी हिरवाई
पानापानात दिसते

ग्रीष्मातही हासतसे
शिर उंच उभवून
करीतसे मंद मंद
सुवासाची पखरण

असा निशिगंध नित्य
जावो बहरत सखी
यावा मनी फुलुनिया
जेव्हा जेव्हा मी निरखी
---------------

Subscribe to RSS - एक वेडा निशिगंध