चला खरं बोलू
Submitted by तिलकधारी on 9 May, 2013 - 06:23
आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. माध्यान्हीची रणरण विरल्यामुळे मनाशी लाडेलाडे करणार्या नवजात सुखद झुळुका प्रफुल्लीत राहायला सांगत आहेत. एकाच आकाशात एकीकडे गडदता आणि दुसरीकडे उतरत चाललेली लाली दिसत असल्यामुळे आकाशाचा राग येतो आहे. जन्मापासून या आकाशाने रंगबदल आणि ऋतूबदल याशिवाय काही दिले नाही. त्यात पुन्हा एकाचवेळी वेगवेगळे रंग दाखवून संभ्रमीत केले. उतरत चाललेल्या लालीकडे धावताना चढ लागला. गडदतेपासून दूर पळताना गडदतेच्या मागेच तीच लाली पुन्हा फिरून येत आहे हे कधी स्वतःहून म्हणालेच नाही आकाश. शाळेत शिकलेल्या अस्सल प्रासादिकतेची ठासून मारली गेली आयुष्य जगताना. किती खोटं बोलायचं!
विषय:
शब्दखुणा: