तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते

तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते

Submitted by तिलकधारी on 1 May, 2013 - 07:55

तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते
गझलांवरती दंगल होते, मन माझे अन् गांगरते!!

डू ऐड्यांचे मुडदे पडती, कत्तल होते ऐड्यांची
बिळात लपुनी घाबरलेली मदत समीती हंबरते

हवा वादळी बघून पळती दुसर्‍या पानावर सारे ;
कधी नव्हे ते जनसंख्येने दुसरे पानहि गुदमरते

मुख्य फरक पडतो गप्पांच्या पानांवरच्या पडिकांना
गझलांवरच्या गप्पांखाली त्यांची चिवचिव चेंगरते

तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
आत्मघातकी पथक बाँबच्या पायघड्याही अंथरते

थिजलेल्या काळास कुणाची नजर न लागो म्हणून बघ....

Subscribe to RSS - तिनिसांजेला माबोवरती एक टोळके वावरते