घनःशाम सुंदरा विडंबन

घन उष्ण पिवळा (घनःशाम सुंदरा - विडंबन)

Submitted by दाद on 18 April, 2013 - 23:41

घन उष्ण पिवळा पीवळा
पडसोदय झाला
धरी लवकरी रुमाला, रुमाला
धरी लवकरी रुमाल नासिकातळी श्लेम आला॥

आणुनद्या लॉजिंजीस, ही बाटली
व्हिक्सची सरली
करी गार्गल मिठ-पाणी घेउनी
रेकी घसा शेकी
"गरम शेण लेपा" देती कुणी अचरटसा सल्ला.......॥१||

सायंकाळी एकेवेळी
खो-गो अवघे भक्षी
अरुणोदय होताच जळाची
गरम पिशवी कुक्षी
प्रभातकाळी उठुनी लावली
सुंठ निज वक्षी
करुनी सडा युकॅलिप्टस, झोपी.....
गुंडाळुन मफलरशी
शिंका, ताप, पडसे, ..... बरा हा होईल कधी खोकला?.......॥२||

Subscribe to RSS - घनःशाम सुंदरा विडंबन