चारोळी पारिजाता

दोन चारोळ्या

Submitted by पारिजाता on 11 April, 2013 - 08:54

मनातले गूज मनी राहून गेले.
मातीचेच घर होते, वाहून गेले.
राजबिंडा एक मेघ चार दिस बरसला.
एक छोटे विश्व त्यात नाहून गेले.

*********************************************

नको असा इतका माझ्या जवळ जवळ येऊ.
नको असे आव्हान माझ्या निश्चयाला देऊ.
नको होऊ इतका लोभस, इतका हवाहवासा.
नको करू जीव माझा, असा पाण्याविना मासा.

*********************************************

Subscribe to RSS - चारोळी पारिजाता