दोन चारोळ्या

Submitted by पारिजाता on 11 April, 2013 - 08:54

मनातले गूज मनी राहून गेले.
मातीचेच घर होते, वाहून गेले.
राजबिंडा एक मेघ चार दिस बरसला.
एक छोटे विश्व त्यात नाहून गेले.

*********************************************

नको असा इतका माझ्या जवळ जवळ येऊ.
नको असे आव्हान माझ्या निश्चयाला देऊ.
नको होऊ इतका लोभस, इतका हवाहवासा.
नको करू जीव माझा, असा पाण्याविना मासा.

*********************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरी चारोळी सगळी आवडली ... >>>>रिया +१

फक्त शेवटची ओळ नाही आवडली त्यातली.. काही बदलता येतय का बघ न!>>>> असहमत ..प्रचंड असहमत !!!
(वेडीच्चय्स बघ रियुडे तू..... अगं तीच तर ओळ हासिले-चारोळी आहे गं !!!! )

@पारिजाता : फुकटचा सल्ला ...............
की दुसरी चरोळी अष्टाक्षरीच्या लयीत बसवा अजून मस्त होईल जशी की ती शेवटची ओळ आहेच <<<<<<<नको करू जीव माझा, असा पाण्याविना मासा.>>>>>(८+८ अक्षरे एका ओळीत)

दोन्हीही चारोळ्या मस्तच !

मी वाचलेल्या प्रसिध्द रामदास फुटाणे रचित चारोळ्या खास करुन खुसखुशीत, टिकात्मक, उपहासात्मकच जास्त होत्या.

नितिनचंद्रजी ...त्यास "वात्रटिका" असे खास नाव आहे हा चारोळ्यांचा खास वेगळा प्रकारच रामदासजींनी मराठीला दिलाय असे म्हणतात

धन्यवाद वैवकु, नितिन, माधवी. Happy
वैवकु, हं लय गंडली आहे हे जाणवत होतं मला, पण मला ते शब्द सच्चे वाटत होते म्हणून जास्त दुरुस्त्या केल्या नाहीत. पण तुम्ही म्हणता आहात तो पॉईंट मस्त आहे. (जमेल का नाहि माहीत नाही Sad ) ते अष्टाक्षरीचं नव्हतं लक्षात आलं. बघते प्रयत्न करून. थँक्स Happy
आणि फुकटचा काय म्हणताय? किती योग्य आहे तो सल्ला. Happy

असे करता येते आहे .........हे घ्या ..

नको असा इतका तू । माझ्या जवळ येऊस.
नको माझ्या निश्चयाला । असे आव्हान देऊस.
नको होऊस इतका । लोभस, हवाहवासा.
नको करू जीव माझा । असा पाण्याविना मासा.

आज आहे एनजेसी | उद्या होऊका न्युर्वासी | (न्युयार्कवासी)
मी कुठे नकळे मज | आहे मी उसगावासी |
मायबोली ही कळेना | परकी का उपर्‍यासी |
संचारतो कुठे पण | वाव दिलाय ज्येष्ठाशी | ( सिनीयर म्हणजे ज्येष्ठ )

हुश्श्! झाली एकदाची आठोळी.:फिदी:

झक्की आकाशकंदिल घ्या.:दिवा: हलकाच घ्या.:स्मित:

ओमा, जाई, अज्ञात, कनन थँक्स.. ( कौतुकातलं थोडं माझ्यासाठी आहे असं गृहित धरून ) Happy
वैवकु, मस्त. फार आवडलं. फक्त तिसर्‍या ओळित मात्रा कमी आहेत का? मी म्हणून बघते आहे तेंव्हा वाटतंय.
भारतीताई तुम्हाला आवडल्या हे खूप आहे माझ्यासाठी. Happy
झक्की काका, चारोळ्यांबद्दल काय वाटलं ते विसरलात का लिहायला? Wink

फक्त तिसर्‍या ओळित मात्रा कमी आहेत का?>>>>>> इथे अष्टाक्षरी हा अक्षरछंद वापरायचा आहे म्हणजे फक्त अक्षरांची संख्या मोजायची असते मात्रा नाहीत

गुणगुणण्यासाठी म्हणून प्रत्येक अक्षर गा अश्या दोन मात्रांचे मनोमन मानून दीर्घ गुणगुणायचे असते

Happy

वैवकु कशाला हे उगाच?
मला मुळ चारोळीच भावली... हा पर्याय अजिबात नाही..

माझं एक स्पष्ट मत आहे... दुसर्‍याच्या "मुलाला" वळण लावायच्या फंदात पडू नये...
स्वतःच्या मुलाला केवळ आईच घडवू शकते...
आपण फक्त त्यात काय खटकलं ते सांगावं
वै पण स्पष्ट मत.. कृ गै न

वैवकु कशाला हे उगाच?>>
हे उगाच नाही आहे बाळ रिया मला वैयक्तिक गरज वाटली म्हणून मी तसे केले मला गरज जाणवण्यामागे एका सर्जनशील व बर्‍यापैकी जाणकार कविमनाच्या जाणिवा आहेत (होय मला कवितेतले नक्कीच तुझ्यापेक्षा जास्त समजते !!!!!)
मी जे केले त्यास पारिजाताचा उघडघडतरी आक्षेप नाही आहे त्यामुळे आम्ही आपापसात संवाद साधत अहोत असे मान.. तू जास्त मनाला लावून घेवू नकोस

________________________________________
माझं एक स्पष्ट मत आहे... दुसर्‍याच्या "मुलाला" वळण लावायच्या फंदात पडू नये...>>>>>>

मी या आप-पर दृष्टीने पाहिलेच नव्हते !! अजूनही पाहत नाही आहे .
......गैरसमज असेलच तर तो तुला झाला असेल मला नाही झालेला आणि होणारही नाही आहे
_________________________________________

आपण फक्त त्यात काय खटकलं ते सांगावं>>>>>>>>

ओके पटले !!! तसेच करेन
इतकेच काय यापुढे तुझी अनुमती मागेन तितकेही करण्यापूरर्वी ..
..पण त्या साठी कृपया तुझा फोन नंबर देऊन ठेव Happy


(विठ्ठलाशपथ मी सीरियसली बोलतोय गमतीने घेवू नये ही विनंती )

Uhoh प्लिज भांडू नका.
रिया मला पण पर्याय दिलेले आवडत नाहीत. पण वैवकुनी लिहिलं ते मला कसं जमतं यापेक्षा हे असं करता येईल टाईप होतं गं. माझ्यासारख्या शिकाऊला उदाहरण म्हणून. स्वतः ते इतकं सुंदर लिहितात. माझ्या childish चारोळीला पर्यायी कशाला देत बसतील ते. जाऊ देत ना प्लिज Sad

पारे जाऊ देतच ग Happy
मला नव्हतं माहीत त्यांना वाईट वाटेल...
वैभव तुम्हाला राग आला असेल तर सॉरी ... मी प्रतिसाद एडिट करायला तयार आहे.... तुम्हाला माझ्यपेक्षा कवितेतलं जास्तच कळत याबद्दल एका चकार शब्दानेही विरोध नाही.. ते आहेच.. पण मला काय खटकलं यावर चर्चा झाली आणि समोरच्याने त्यानुसार बदल केले तर सगळ्यांनाच शिकायला मिळत हा हेतू होता... तुम्ही स्वतः ही ओळ अशी हवी अस लिहुन दिलंत तर चर्चा थांबते म्हणून मी म्हणाले.