अठवण... काव्य कविता

माझे आयुष्य

Submitted by अंकुरादित्य on 19 November, 2013 - 21:44

काही शब्द आजही मनात आहेत
जे ओठापर्यंत कधी आलेच नाहीत
काही पत्रे अजूनही कपाटात आहेत
जी पोस्टापर्यंत कधी पोचलीच नाहीत
काही अश्रू अजूनही कुठेतरी डोळ्यात आहेत
जे कधी गालावरून ओघळलेच नाहीत
काही भावना अजूनही अंकुरित आहेत
ज्या कधी डवरल्या अन बहरल्याच नाहीत
काही मी अजूनही सैरभैर धावत आहेत
जे अजूनही मला भेटलेच नाहीत
काही क्षण अजूनही उपऱ्याचे आयुष्य जगत आहेत
जे मी कधी अनुभवलेच नाहीत
आयुष्यातले काही भोग अजून बाकी आहेत
जे अजून मी भोगलेच नाहीत . . .
जगुनही जगायचे राहिले
समजूनही समजवायचे राहिले

काही अठवणी...!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 26 July, 2013 - 12:52

काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या

काही आनंदी...सुखाच्या
काही त्रासिक...दु:खाच्या
काही केवळ..जनातल्या
कित्येकांच्या..मनातल्या!

काही..हसर्‍या मुलांच्या
काही..गळल्या फुलांच्या
देठांनाही सोडून गेल्या..
उमलणार्‍या कळ्यांच्या!

काही माझ्या गावाच्या
काहि..तर,नुसत्या नावाच्या
काही...दूरं देशांच्या
तळहातांवरिल..रेशांच्या!

काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!

बेबंदिच्या अठवणी काही..
मुक्त मोकळ्या वाटांच्या
फुलांनिही बहरून यावे
अश्या गोजिर्‍या क्षणांच्या

Subscribe to RSS - अठवण... काव्य कविता