माझे आयुष्य

Submitted by अंकुरादित्य on 19 November, 2013 - 21:44

काही शब्द आजही मनात आहेत
जे ओठापर्यंत कधी आलेच नाहीत
काही पत्रे अजूनही कपाटात आहेत
जी पोस्टापर्यंत कधी पोचलीच नाहीत
काही अश्रू अजूनही कुठेतरी डोळ्यात आहेत
जे कधी गालावरून ओघळलेच नाहीत
काही भावना अजूनही अंकुरित आहेत
ज्या कधी डवरल्या अन बहरल्याच नाहीत
काही मी अजूनही सैरभैर धावत आहेत
जे अजूनही मला भेटलेच नाहीत
काही क्षण अजूनही उपऱ्याचे आयुष्य जगत आहेत
जे मी कधी अनुभवलेच नाहीत
आयुष्यातले काही भोग अजून बाकी आहेत
जे अजून मी भोगलेच नाहीत . . .
जगुनही जगायचे राहिले
समजूनही समजवायचे राहिले
ओळखूनही पारखायचे राहिले
माझे आजपर्यंतचे आयुष्य
जगुनही काही जगायचे राहूनच गेले !

Group content visibility: 
Public - accessible to all site users