कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा? वनिता -4

कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा?

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 7 February, 2013 - 21:32

कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा?
आज मनाच्या दारी झरती अमृतधारा

अवघड वाटा अंधाराच्या तुडवत आले
चैतन्याचा उधळत मागे प्रकाश सारा

गलबत माझे माझ्यासोबत फितूर झाले
तरण्यासाठी एकच दिसला तुझा किनारा

किंचित ओले भिजले डोळे आज कशाने ?
वितळत जाई हृदयामधला किल्मिष पारा

आयुष्याला अर्थ नव्याने, तुझीच माया !
वेचत जाते आज सुखाच्या असंख्य गारा

नीतूला हे समजुन आले फार उशीरा
मागावे ते मिळते तुटता नभांत तारा

वनिता....

Subscribe to RSS - कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा? वनिता -4