कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा?

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 7 February, 2013 - 21:32

कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा?
आज मनाच्या दारी झरती अमृतधारा

अवघड वाटा अंधाराच्या तुडवत आले
चैतन्याचा उधळत मागे प्रकाश सारा

गलबत माझे माझ्यासोबत फितूर झाले
तरण्यासाठी एकच दिसला तुझा किनारा

किंचित ओले भिजले डोळे आज कशाने ?
वितळत जाई हृदयामधला किल्मिष पारा

आयुष्याला अर्थ नव्याने, तुझीच माया !
वेचत जाते आज सुखाच्या असंख्य गारा

नीतूला हे समजुन आले फार उशीरा
मागावे ते मिळते तुटता नभांत तारा

वनिता....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफीजी व कण्खरजींशी सहमत
"खयाली तरही" त भाग घेत चला . 'नेमक्या' खयालात कमी पडते तुमची गझल असे वाटते (माझाही हाच प्रोब्लेम होतो बर्‍याचदा)

छानच....
गलबत माझे माझ्यासोबत फितूर झाले
तरण्यासाठी एकच दिसला तुझा किनारा

किंचित ओले भिजले डोळे आज कशाने ?
वितळत जाई हृदयामधला किल्मिष पारा

हे खूप आवडले.... Happy

सुधारणेस वाव असला तरच सुधारणा होऊ शकते

सॉरी बाबा चुकलो तुम्हाला सांगून ....... मीच मूर्ख या गझलेत सुधारणेला वावच नाहीच आहे हे मलाच समजायलाच हवच होतच

पांडुरंगा माफ कर रे बाबा :(.... नितू मॅडमना माही रे ....मला..मला !!!

टीपः असला तरच असले चालाखी भरे धूर्त शब्दप्रयोग जमल्यास टाळा नाहीतर किमान माझ्याकडून स्त्रीदाक्षिण्य वगैरेची फोल अपेक्षा करू नका अशी नम्र विनंती

मराठी भाषा आहे ...वळवाल तशी वळते ...मला एवढेच म्हणायचे होते कि मला पटले आहे कि माझ्या रचनेत सुधारणेला वाव आहे.... आणि मी तो प्रयत्न प्रामाणिकपणे करतेय....याउप्पर मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही ...आणि हो "असला तरच असले चालाखी भरे धूर्त शब्दप्रयोग ""नितू मॅडमना"? असले शब्दप्रयोग मला आवडत नाहीत कृपया याची नोंद घ्या ... ...आणि मी कधीही चलाखी करत नाही.... आणि एखाद्या रचनेचा स्त्री किंवा पुरुष असण्याशी काय संबंध?

टीप: प्रत्येक जन प्रत्येक वेळी "sarcastic "च बोलतो असे नसते.... वाक्याचा कधी कधी दुसरा अर्थही लावून पहा ....धन्यवाद...लेखन सीमा .

या रचनेत मी मात्रा चुकले होते.... इथे पोस्टायाच्या आधी मी अरविंदकाकांना आणि क्रांतीताईला विचारून जमेल तेवढी सुधारून पोस्टली आहे... (जर खात्री असती ती परफेक्टच आहे..तर कोणाला विचारायच्या प्रश्न आलाच नसता) नाही का ?

याउप्पर मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही >>>>त्यानेतर तुम्हाला तेवढेही स्पष्टीकरण मागीतले नव्हते

कृपया याची नोंद घ्या >>>> असे सांगीतलेत तो मुद्दाम अजूनच करतो

आणि एखाद्या रचनेचा स्त्री किंवा पुरुष असण्याशी काय संबंध? >>>बरोबरय नीतू मॅडम पण बहुधा वैवकु जनरली स्त्री लेखिकाना दिल्याजाणार्‍या वागणुकीबद्दल बोलतोय प्रतिसादाबद्दल बोलतोय अन सांगतोय की मी तसा भेदभाव मानणार्‍यातला नाही वगैरे ..बाईमाणुस म्हटलं की उगाचच विशेष नरमाईने बोलावे ...तीला दुखावू नये हे त्याला मूर्खास जमत नाही (गाढवास गुळाची चव काय??)

असो

फार वाईट वाटून नका घेवू :)..... "नितू मॅडम" !! Lol

वैवकुच्या नादी लागू नका इथले लोक त्याला पिंपळावरचे पिशाच्छ पाहून दुरून नमस्कार करावा तसे वागवतात तुम्हीही तसेच करावे Rofl

आपलाच
~नवाच एक कुणीतरी

भा.पो.

सर्व गजलच अप्रतिम ...

किंचित ओले भिजले डोळे आज कशाने ?
वितळत जाई हृदयामधला किल्मिष पारा >>>> हे विशेष आवडले...

फितूर हा शब्द पुन्हा एकदा गोंधळात टाकतो आहे.
म क स वर छान चर्चा झाली होती. क्रांतीताईंनी फारच प्रभावी भाष्य केले होते तिथे.

इतर सर्वच शेर आवडले.