शेंदूर

शेंदूर

Submitted by निंबुडा on 16 January, 2013 - 04:02

शेंदराने माखलेली मूर्ती पाहिलीत का कधी?
लेपावर लेप..
पुटांवरती पुटं..
आणि मग झाकले जाते
आतल्या मूर्तीचे मूळ रुप, रंग
सुंदर, रेखीव आकाराचे रुपांतर होते
एका ओबढ धोबड आकारात
..
..
..
तसाच वेदनांचा शेंदूर फासत जाते नियती
आणि तुम्ही मला विचारता,
आधीची 'तू' कुठे हरवलीस?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शेंदूर