राहील फार काळ न शाबूत धन तुझे

राहील फार काळ न शाबूत धन तुझे

Submitted by बेफ़िकीर on 3 December, 2012 - 13:14

राहील फार काळ न शाबूत धन तुझे
मिरवेल जेमतेम जवानीच तन तुझे

बेशुद्ध माणसांत जगत एकटाच पी
शुद्धीत आणणार कुणाला व्यसन तुझे

त्याच्यावरी विसंबत जगलीस आजवर
ज्याच्या कह्यामधे मन त्याचे न मन तुझे

केव्हातरीच ओळ सुचवते मला गझल
केव्हातरी नभावर येतात घन तुझे

मी धाप लागल्यास उतरतो अश्या जगी
जेथे न पोचणार कधीही गगन तुझे

तेथे मिळत असून स्वतःला स्वतःच तो
बसणार कोण भेदत घनदाट वन तुझे

लावेल आग तो न असो आपला कुणी
होईल 'बेफिकीर' तर्‍हेने दहन तुझे

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - राहील फार काळ न शाबूत धन तुझे