राहील फार काळ न शाबूत धन तुझे

Submitted by बेफ़िकीर on 3 December, 2012 - 13:14

राहील फार काळ न शाबूत धन तुझे
मिरवेल जेमतेम जवानीच तन तुझे

बेशुद्ध माणसांत जगत एकटाच पी
शुद्धीत आणणार कुणाला व्यसन तुझे

त्याच्यावरी विसंबत जगलीस आजवर
ज्याच्या कह्यामधे मन त्याचे न मन तुझे

केव्हातरीच ओळ सुचवते मला गझल
केव्हातरी नभावर येतात घन तुझे

मी धाप लागल्यास उतरतो अश्या जगी
जेथे न पोचणार कधीही गगन तुझे

तेथे मिळत असून स्वतःला स्वतःच तो
बसणार कोण भेदत घनदाट वन तुझे

लावेल आग तो न असो आपला कुणी
होईल 'बेफिकीर' तर्‍हेने दहन तुझे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुतुहलजन्यांसाठी:

१. लगावली - गागा लगाल गाललगा गालगालगा

२. जवानी ऐवजी तारुण्यः हा शेर असा होऊ शकत असूनही असाच केला:

>>>राहील फार काळ न शाबूत धन तुझे
मिरवेल जेमतेम जवानीच तन तुझे<<<

ऐवजी असा होऊ शकला असता:

>>>राहील फार काळ न शाबूत धन तुझे
मिरवेल जेमतेमच तारुण्य तन तुझे<<<

हे केवळ सुलभता व तीव्रतेसाठी

धन्यवाद वाचनाबद्दल!

-'बेफिकीर'!

गझल आवडली खूप आवडली

लावेल आग तो न असो आपला कुणी
होईल 'बेफिकीर' तर्‍हेने दहन तुझे>>>> (..................)

अवांतरः कालचा माझा एस् एम् एस् मिळाला का बेफीजी ?

एस एम एस आणि विठ्ठलाचा प्रसाद दोन्ही मिळाले. सांगायचे राहिले माफ करा. दोन्ही आवडले पण विठ्ठलाचा प्रसाद जरा जास्त आवडला. Happy

धन्यवाद या प्रेमाबद्दल!

-'बेफिकीर'!

धन्स बेफीजी !!
कालचा जो शेर होता ना माझा त्याच्या अवतीभवती अनेक शेर जमले अन एक मुसल्सल शेरान्ची मालिकाच तयार झाली तुम्हाला ऐकवायची आहे नन्तरच प्रकाशित करीन

आहात का पुण्यात ? आणि हो.....प्रसाद विठ्ठलाचा होता त्याचेच आभार माना Happy

तेथे मिळत असून स्वतःला स्वतःच तो
बसणार कोण भेदत घनदाट वन तुझे

शेर फार आवडला.

गझल आवडली. वृत्त खूप आवडले.

>> केव्हातरीच ओळ सुचवते मला गझल
केव्हातरी नभावर येतात घन तुझे

मी धाप लागल्यास उतरतो अश्या जगी
जेथे न पोचणार कधीही गगन तुझे >>

नेहमीप्रमाणेच कसदार गझल.

>> तेथे मिळत असून स्वतःला स्वतःच तो
बसणार कोण भेदत घनदाट वन तुझे >>
शब्दरचनेमुळे गूढ झालेल्या या ओळी..यांच्याकडे लक्ष वेधले गेले.
तुझ्या निबिड अरण्यात तो स्वतःलाच तर भेटणारेय.. मग वन भेदून जायची गरजच काय हे आयुष्याच्या अर्थाचे अरण्य आहे का ?की तिच्या अतर्क्य वागण्याचे ?

मी धाप लागल्यास उतरतो अश्या जगी
जेथे न पोचणार कधीही गगन तुझे

तेथे मिळत असून स्वतःला स्वतःच तो
बसणार कोण भेदत घनदाट वन तुझे

व्वा! वाह!!

गझल आवडलीच.

सुरेख गझल..

तेथे मिळत असून स्वतःला स्वतःच तो
बसणार कोण भेदत घनदाट वन तुझे

अप्रतिम शेर...

शुभेच्छा..

गझल आवडली. पुढील शेर जास्त भावले-

मी धाप लागल्यास उतरतो अश्या जगी
जेथे न पोचणार कधीही गगन तुझे

तेथे मिळत असून स्वतःला स्वतःच तो
बसणार कोण भेदत घनदाट वन तुझे