English Vinglish

'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglish - Movie Review)

Submitted by रसप on 7 October, 2012 - 01:57

प्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - English Vinglish