ईश्वराची नसे दिरंगाई

ईश्वराची नसे दिरंगाई

Submitted by जयन्ता५२ on 20 September, 2012 - 10:39

ईश्वराची नसे दिरंगाई
प्रार्थनांना अवाजवी घाई

काल थेंबा विना दिवस गेला
आजचा हा प्रलय अजब भरपाई

जन्म गेला तिला विनवतांना
संमतीची तरी अपूर्वाई !

मोडला तो करार दोघांनी
वाळण्याचे बघेल ती शाई!

पर्वताला कुणी तरी सांगा
काल होतास एवढी राई

----- ---------------------- जयन्ता५२

Subscribe to RSS - ईश्वराची नसे दिरंगाई