चिव् चिव् चिमणी

मण्णी मण्णी, चिव् चिव् चिमणी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2012 - 11:35

मण्णी मण्णी
चिव् चिव् चिमणी

टपटप टिपते
तांदूळ मणी
थेंब थेंब पिते
वाकून पाणी

इकडे तिकडे
बघत म्हणते
आहे का कुणी
मी तर चिमणी

पायावर कशी
थुई थुई नाचते
नाचत म्हणते
चिव् चिव् चिमणी

Subscribe to RSS - चिव् चिव् चिमणी