मन्नी मन्नी आमची माऊ

मन्नी मन्नी आमची माऊ

Submitted by पुरंदरे शशांक on 22 August, 2012 - 01:17

मन्नी मन्नी आमची माऊ
येताय का कडे भुर्र जाऊ

कश्शी खुलली कळी आता
भुर्रचं नुस्तं नाव काढता

हात पसरुन लगेच तयार
मन्नी आमची कस्ली हुशार

थांब जरा बदलुंदे फ्रॉक
लग्गेच नकोय नाकावर राग

वाजता सँडल बघते कश्शी -
'नेणारे मला का निघ्घाली तश्शी '....

Subscribe to RSS - मन्नी मन्नी आमची माऊ