चिऊतै चिऊतै
Submitted by पुरंदरे शशांक on 15 August, 2012 - 23:01
चिऊतै चिऊतै
घरात का येत नै
दाणे खा थोडेसे
पाणी प्या जरासे
अंगणात छोटी थाळी
थाळीत गार पाणी
भुडुश (आंबो) करा चिव्चिव करुन
मग उडा पंख पसरुन....
आता हे बघा शामने सुसंस्कारित केलेले नवे वर्जन (बोबड्या स्वरात गोडी कित्ती वाढलीये ती .......)
चिऊतै चिऊतै
घलात का येत नै
दाणे खा थोलेसे
पाणी प्या जलासे
ठेवली मी अंगणात
पाण्याची पलात
भुडुश कला चिव्चिव कलून
मग उला पंख पशलून....
(शामकडे अशा नॅक (करामती) सापडतात सिद्धहस्त लेखक/ कवि असल्यामुळे..)
शब्दखुणा: