इंग्लंडचं निवासवर्णन

ऑक्सफर्डचं विहंगावलोकन!

Submitted by चिमण on 12 November, 2012 - 08:48

कालिदासाचं मेघदूत म्हणजे मान्सूनच्या ताज्या ताज्या ढगांच्या दक्षिणोत्तर प्रवासाचं वर्णन आहे म्हणून फार पूर्वी पुण्याच्या एका डॉक्टरांनी ते पडताळून पहायचं ठरवलं. त्यांचं स्वतःचं विमान होतं. मान्सून आल्या आल्या त्यांनी विमानातून ढगांबरोबर प्रवास केला आणि खाली जे काय दिसलं ते मेघदूताशी पडताळून पाहून मेघदूतावर ISI चा शिक्का मारला. हे सगळं मी ऐकल्यावर मला पण ऑक्सफर्डचा मेघदूत व्हायची हु़क्की आली.

ऑक्सफर्डचा फेरफटका

Submitted by चिमण on 18 October, 2012 - 14:29

जगातल्या अग्रेसर विद्यापीठांमधे ऑक्सफर्डची गणना होते हे पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त नाही इतकं सर्वश्रुत आहे. गाढ्या विचारवंतांचा आणि संशोधकांचा सुळसुळाट असलेलं, ८०० वर्षांपेक्षा जुनं, ऑक्सफर्ड विद्यापीठ आत्तापर्यंत ५० च्या वर नोबेल पारितोषिकांचं धनी आहे. जुनी कॉलेजं व जुन्या वास्तू अजूनही टिकून आहेत. नुसत्या टिकूनच नाहीत तर वापरात पण आहेत. याचं एक कारण शासकीय प्रयत्न व अनुदान आणि दुसरं हिटलर! हे कारण एखादं काम न झाल्याचा दोष वक्री शनीला देण्याइतका हास्यास्पद वाटेल पण दुसर्‍या महायुद्धात ऑक्सफर्डवर बाँब टाकायचे नाहीत असा हिटलरचा हुकूम होता.

इंग्लंड मधील भत्ताचारी लोक!

Submitted by चिमण on 7 August, 2012 - 13:54

न्यूटन, स्टिफन हॉकिंग, बेअर्ड, ग्रॅहॅम बेल, मॅक्सवेल, डार्विन या सारख्या शास्त्रज्ञांचा, शॅकल्टन, कॅप्टन कुक सारख्या धाडशी माणसांचा व चॅप्लिन, ज्युली अँड्र्यूज सारख्या अभिनेत्यांचा इंग्लंड हा देश असल्यामुळे मला इंग्लंड मधे यायच्या आधी आणि आल्यानंतर काही दिवस इथल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रचंड आदर वगैरे वाटायचा. इथले सर्व लोक प्रचंड हुशार, कामसू व प्रामाणिक असतील हा गैरसमज त्यातूनच झालेला!

Subscribe to RSS - इंग्लंडचं निवासवर्णन